*लोणार सरोवराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*
लोणार सरोवराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही देत यापुढे लोणार विकासाचा कार्यक्रम थेट मुख्यमंत्री कार्यालयातून होईल अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा येथे केली
जगविख्यात लोणार सरोवराला आंतरराष्ट्रीय रामसर पाणथळ क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज 5 जानेवारीला बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराला भेट दिली लोणार येथील वनकुटी व्हु पाईन्ट आणि धारातीर्थ गोमुख परिसरात जावुन त्यांनी सरोवराची पाहणी केली त्यानंतर अधिकार्यांची विशेष बैठक घेऊन लोणार विकास आराखड्यासंदर्भात अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली यावेळी राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे खासदार प्रतापराव जाधव आमदार संजय रायमुलकर आमदार संजय गायकवाड जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषा पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते ते पुढे म्हणाले लोणार सरोवर हे आपल्या सर्वांचे वैभव आहे या वैभवाची चा विकास करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही लोणार सरोवराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व कामे आता मुख्यमंत्री कार्यालयातून केले जातील वेळोवेळी या विकासाच्या कामांचा आढावा मी स्वतः येईल अशी ग्वाही त्यांनी दिली सोबतच मातृतिर्थ सिंदखेडराजाचा विकास आराखडाची कामे अशाच पध्दतीने संपूर्ण विकास केल्या जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले
लोणार सरोवर हे जैवविविधतेचे भांडार आहे. या सरोवराचा विकास करताना एक निश्चित नियोजन तयार करावे. त्यानुसार आराखडा तयार करावा आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी केली तरच हे सरोवर पर्यटनासाठी नावारूपास येईल, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
लोणार सरोवरात जैवविविधता विकसित झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी विकास करताना नेमका विकास कोणत्या पद्धतीने करावा याचा विचार एकत्रितरीत्या करावा. या ठिकाणी मंदिरांची संख्या अधिक आहे, त्यामुळे याठिकाणी वन पर्यटन किंवा मंदिराच्या भेटी अशा पर्यायांपैकी एका पर्यायाची निवड करून त्याच प्रस्तावावर काम करावे. या ठिकाणची वनसंपदा धोक्यात येऊ नये, ते म्हणाले
लोणार सरोवर हे ज्याप्रमाणे वन पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे वैज्ञानिकही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे त्यांचाही विचार होणे गरजेचे आहे. पर्यटकांसाठी या ठिकाणी सरोवराच्या वरच्या बाजूला एक पायरस्ता ठरवावा. या रस्त्यावर पर्यटकांना थांबण्यासाठी स्थळे विकसित करावी. सरोवराच्या चारही बाजूला अशी व्यवस्था झाल्यास पर्यटकांनाही सोयीचे होईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले