*बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे रेमडीसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या 3 जणांना अटक... 10 इंजेक्शन जप्त*
*बुलडाणा* : – रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करीत असल्याच्या माहितीवरुन बुलडाणा एलसीबीच्या पथकाने 5 मे रोजी नांदुरा येथील गैबी नगर परिसरात धाड टाकून 3 आरोपींना अटक केली. यावेळी आरोपीकडून 10 रेमडेसीविर इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे आहे
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडीसीवर इंजेक्शन परिणामकारक ठरत असल्याने या इंजेक्शनची मागणी वाढली आहे या पार्श्वभूमीवर काही लोक या इंजेक्शनचा काळाबाजार करून रुग्णांच्या नातेवाइकांकडून जास्तीचे पैसे घेऊन त्यांना इंजेक्शन विकत देत आहे रुग्णांचा जीव वाचवण्याच्या दृष्टिकोनातून रुग्णांचे नातेवाईक सुद्धा मिळेल त्या किमतीला हे इंजेक्शन विकत घेत आहे या पार्श्वभूमीवर 5 मेच्या संध्याकाळी 5 वाजेदरम्यान नांदुरा येथील गैबी नगर मध्ये
एलसीबीच्या पथकाने धाड टाकुन आरोपी आझाद खा इनूस खा (31) रा.गैबी नगर नांदुरा, अलबग हुसेन उर्फ नुरआलम अबुबकर अंन्सारी (30) रा. खुतरा जि. हजारीबाग (झारखंड), शे. इरफान शे. अजमत (20) रा. गैबी नगर, नांदुरा या तिघांना ताब्यात घेतले आहे, त्यांच्याकडून 10 रेमडेसिवीर इंजेक्शन व 2 मोबाईल,असे एकूण 1 लाख 76 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना नांदुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर या कारवाईमुळे जिल्ह्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार कोठे कोठे होत आहे.याची माहिती आरोपीकडून मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान कारवाईमुळे काळा बाजार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे, विशेष म्हणजे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी यापुर्वीच रेमडेसीवीरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कार्रवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत..
*Yuwaraj wagh buldana*