*कोरोना अलर्ट : प्राप्त 3817 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 641 पॉझिटिव्ह*• 1153 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा, दि.6 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4458 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3817 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 641 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 299 व रॅपीड टेस्टमधील 342 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 873 तर रॅपिड टेस्टमधील 2944 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3817 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर व तालुका : 90, खामगांव शहर व तालुका : 58, शेगांव शहर व तालुका : 5, दे. राजा तालुका व शहर : 59, चिखली शहर व तालुका : 75, मलकापूर शहर व तालुका : 45, नांदुरा शहर व तालुका : 70, लोणार शहर व तालुका : 53, मोताळा शहर व तालुका : 53, जळगांव जामोद शहर व तालुका : 77, सिं. राजा शहर व तालुका : 22 आणि संग्रामपूर शहर व तालुका : 34 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 641 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान टेंभुर्णी जि. जालना येथील 37 वर्षीय महिला व रोहणा ता. खामगांव येथील 79 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 1351 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 374582 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 62937 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 62937 आहे.
आज रोजी 7713 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 374582 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 68844 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 62937 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 5458 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 449 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.