- महाराष्ट्र चेंबर्स चे ‘ऑक्सिजन दान’! दिले 50 ऑक्सिजन काँसंट्रेटर; 5 बीआयपीएपी,बुलडाणा = व्यापार, उधोग जगताच्या हितासाठी झटतांनाच सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ज अँड ऍग्रीकल्चर ने कोरोना प्रकोपातही आपला बाणा जपला आहे, संस्थेने जिल्ह्याला 50 ऑक्सिजन काँसेंट्रेटर व 5 बीआयपीएपी दान केले आहे, ही उपयुक्त उपकरणे जिल्ह्याला प्राप्त झाली आहे, *
राज्य किंवा राष्ट्र संकटात असताना या संस्थेने नेहमीच सढळ हाताने शासनाला वा आपद्ग्रस्तना मदत करण्याची परंपरा एमसीसीआयए ने कायम जोपासली आहे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने संस्थेचे अध्यक्ष सुधीर मेहता व संचालक प्रशांत गिरबाजे यांच्या पुढाकाराने व पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स च्या माध्यमाने राज्यातील जिल्ह्यांना उपकरणे, साहित्य दान देन्याचा निर्णय घेण्यात आला, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून उपकरणांचे वितरण करण्यात आले,*
बुलडाणा जिल्ह्यात वरील साहित्य काल शुक्रवारी प्राप्त झाले, ओसी हे रुग्णाला ऑक्सिजन देणारे पोर्टेबल मशीन असून कुठेही हलवता येते, बीआयपीएपी हे व्हेंटिलेटर सारखे उपकरण आहे, संस्थेने जिल्हाधिकारी एस रामामुर्ती यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी तात्काळ प्रतिसाद दिला, आरडीसी दिनेश गीते व उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे यांनी तात्काळ नियोजन करीत हीं उपकरणे पुणे येथून जिल्ह्यात आणण्याची व्यवस्था केली,