बुलढाणेकरांनो कडक लॉकडाऊनची मोर्चेबांधणी झाली .. रात्री 8 वाजेपासून अंमलबजावणी होणार सुरू
बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसे गणित वाढत चालला आहे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊनची भूमिका लोकप्रतिनिधींनी व्यक्त केल्यानंतर प्रशासनाने सुद्धा त्या दृष्टिकोनातून अंमलबजावणी सुरू केली 10 मे च्या रात्री आठ वाजेपासून बुलढाणा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पाळल्या जाणार आहे त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन महसूल विभाग आणि नगरपालिका प्रशासनाने आपली पूर्व तयारी केली आहे गर्दी टाळण्याच्या दृष्टिकोनातून आणि लॉकडाऊनची अंमलबजावणी कठोर करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत त्यानुसार काही रस्ते एक मार्गी करण्यात आले आहेत तर अनेक रस्ते अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत गर्दीचे ठिकाण असलेल्या जागी पोलिस पहारा राहणार असून चौकाचौकांमध्ये पोलिस तैनात करण्यात आले आहेत ठिकाणी बॅरिकेट लावून रस्ते अडवण्यात आले आहे जेणेकरून पोलीस प्रशासनाला विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांकारवर दंडात्मक कारवाई करण्यास सोयीचे जाईल शिवाय कोणतेही प्रतिष्ठान सुरू राहणार नाही या दृष्टिकोनातून नगरपालिका प्रशासनाने वेगवेगळी 10 पथके नियुक्त केली असून ते शहरातील प्रतिष्ठानांवर लक्ष ठेवून राहणार आहेत शिवाय पोलीस विभाग विनाकारण गावात फिरणा -या व्यक्तिंवर दंडात्मक कारवाई करणार आहे या दृष्टिकोनातून व्युहरचना तयार झाली असून त्याची अंमलबजावणी रात्री आठ वाजेपासून सुरू होणार आहे तेव्हा बाहेर निघताना विचारपूर्वक निघा अन्यथा आपल्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते याचं भान बुलढाणेकर यांनी ठेवाव ..घरीच रहा सुरक्षित रहा आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी योगदान द्या…