माजी मंत्री सुबोध सावजी यांनी दिले कोविडसाठी एक महिन्याचे मानधन

0
92

कोरोनाच्या या बिकट परिस्थितीमध्ये संपूर्ण राज्य आर्थिक अडचणीत सापडले आहे, याची जाणीव ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासत राज्याचे माजी महसूल राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी आपले एक महिन्याचे मानधन हे कोविड परिस्थीतीत खर्च करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे 70 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे.तर राज्यातील सर्व मंत्री, खासदार , आमदार , यांनी देखील आपले एक महिन्याचे मानधन देऊन राज्य सरकार ला आर्थिक हातभार लावावा सोबतच ज्या अधिकाऱ्यांना 45 हजार रुपये पेक्षा जास्त वेतन आहे अशा अधिकाऱ्यांनी देखील आपले एक महिन्याचे वेतन किंवा निवृत्तीवेतन शासनाला द्यावे व ज्या अधिकाऱ्यांना 45 हजार पेक्षा कमी पगार आहे अशांनी आपला निम्मा पगार हा कोविड खर्चासाठी द्यावा अशी आशा देखील सुबोध सावजी यांनी यावेळी व्यक्त केली आहे.यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे , जिल्हाधिकारी एस राममूर्ती ऍड साहेबराव सरदार, शैलेश सावजी, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here