- *चिखली येथील नियोजित कोविड सेंटर कामात होत असलेल्या दिरंगाई बद्दल डॉ शिंगणे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली*
चिखली शहर व परिसरामध्ये कोरोनाचा महामारीचा वाढत चाललेला आलेख पाहता रुग्णांवर लवकरात लवकर इलाज व्हावा यादृष्टीने चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात शासकीय कोविड सेन्टर सुरू करण्यात येत आहे. या नियोजीत कोविड सेन्टर ला आज दि 15 मे रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री , तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी भेट दिली व कामाची पाहणी केली. चिखली शहरातील कोरोना रुग्णाची वाढत जाणारी संख्या लक्षात घेता पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी डी सी एच सी अंतर्गत 50 खाटाचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र कामात होत असलेल्या दिरंगाई बद्दल डॉ शिंगणे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. तर आगामी 6 दिवसांमध्ये काम पूर्ण करावे असे सक्त आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी त्यांच्यासमवेत आ श्वेता महाले, राष्ट्रवादी काँगेस चे शहराध्यक्ष रवी तोडकर, जनसंपर्क अधिकारी संतोष लोखंडे, डॉ.खान मॅडम , पत्रकार कैलास शर्मा , चिखली अर्बन चे संचालक शैलेश बाहेती, एकता अर्बन चे अध्यक्ष शे अनिस शे बुढन, आदी मान्यवर होते